breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहराचे भवितव्य 50 नगरसेवकांच्या हाती, 78 नगरसेवकांची ‘बजेट’च्या सभेला दांडी   

  • 78 नगरसेवकांनी प्रभागाचे हीत सोडले वा-यावर
  • शहराची धुरा आली केवळ 50 नगरसेवकांच्या हाती

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी घेण्यासाठी आजची विशेष सभा घेण्यात येत आहे. साडेतीन ते चार हजार कोटी बजेटचा समावेश असलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षाचे केवळ 50 नगरसेवक सभागृहात चर्चेस उपस्थित आहेत. अन्य 78 नगरसेवकांनी या सभेकडे सपशेल पाठ फिरवली आहे. त्याना प्रभागातील विकास कामांची काळजी आणि मतदारांची तिळमात्र चिंता नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. केवळ 50 नगरसेवक संपूर्ण शहराच्या विकासाची दिशा ठरवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • सत्ताधारी भाजप आणि मनपा प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकातील तृटी मांडणे, स्वतःच्या प्रभागातील विकासनिधीचा आढावा घेणे, महत्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करणे, एखाद्या प्रकल्पाचा अंदाजपत्रकात समावेश नसेल तर तो करून घेणे, पुरेसा निधी नसेल तर तो उपलब्ध करून घेणे यासह नागरिकांसाठी उद्यान, रुग्णालये, विरंगुळा केंद्र, विद्यार्थ्यांसाठी शाळा आदी सेवा सुविधांच्या संदर्भात शहरातील 128 नगरसेवकांसह स्वीकृत सदस्यांना अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार आहे. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि मनपा प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक तंतोतंत खरे असेलच असे नाही. त्यामुळे यातील तृटी काढून सुधारणा करण्यासाठी सूचना आणि अभिप्राय घेण्यासाठी आजची विशेष सभा घेण्यात येत आहे.

परंतु, बजेटच्या या सभेला सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या 128 नगरसेवकांपैकी केवळ 50 नगरसेवक उपस्थित आहेत. उर्वरीत 78 नगरसेवकांनी बजेटच्या सभेकडे पाठ फिरवली आहे. सभेला उपस्थिती लावून सभागृहाच्या बाहेर कधी एकदा पडेन यावरच सर्वांचा भर असतो. तर, काही नगरसेवकांनी महासभा असो अथवा पालिकेचा महत्वाचा उपक्रम, कार्यक्रम त्यांना कशातच रस असल्याचे दिसत नाही. जर अशी परिस्थिती असेल तर शहराचा सुजान नागरिक म्हणून ज्यांनी त्यांना निवडून दिले, त्यांची ही घोर फसवणूक आहे. अशा दांडीबहाद्दर नगरसेवकाला सत्ताधारी भाजपमधील पालिकेचा किल्ला सांभाळणारे शिलेदार एका शब्दानेही पुन्हा बोलू देणार नाहीत. त्यांना विकासाच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार सुध्दा उरणार नाही, असा त्यांचा समज झाल्याशिवाय राहणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button