breaking-newsTOP Newsपुणेमहाराष्ट्र

शरीर सुखाला नकार दिल्यानंतर भावजयीचा दिराने केला खून

पुणे | महाईन्यूज

वारंवार शरीर सुखाची मागणी करूनही भावजयी तयार होत नसल्याच्या रागातून नराधम दीरानं भावजयीवर तीक्ष हत्यारानं प्राणघातक वार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुरंदर तालुक्यातील रिसे येथे ही थरारक घटना घडली. खून केल्यानंतर आरोपी दीर मुबारक कादर सय्यद फरार झाला आहे.

जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिसे येथील आरोपी मुबारक कादर सय्यद हा आपल्या भावजयीला वारंवार त्रास देत होता. तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणीही त्याने केली होती. मात्र, तिने प्रखर विरोध केला होता. मुबारकने 21 सप्टेंबरच्या रात्री जेवणानंतर घराचे बाहेर भांडी घासत असताना तिला पुन्हा शरीर सुखाची मागणी केली. मात्र, तिनं नकार दिल्यानं रागाच्या भरात आरोपी मुबारक कादर सय्यद यानं घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून भावाजयीवर हल्ला केला. सुरीनं तिचा गळा आणि छातीवर सपासप वार केला. भावजयीचा जागेवरच मृत्यू झाला. घरातील इतर सदस्यांनी आरडाओरडा केला असता आरोपी पसार झाला.

या प्रकरणी मृत महिलेची मुलगी हसीना नासीर मुलानी हिनं जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीचा शोध घेण्यास दोन पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button