breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#CoronaVirus: पुण्यात गरीबांसाठी ‘शिवभोजन’च्या धर्तीवर ‘शरद भोजन’ योजना

पुणे: राज्यात ‘शिवभोजन योजने’ला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच पुण्यात मात्र, ‘शिवभोजन’ योजनेच्या धर्तीवर ‘शरद भोजन’ योजना सुरू करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेने तसा निर्णय घेतला असून सर्व गटविकास अधिकाऱ्यांना ही योजना राबविण्यातबाबतचं पत्रंही पाठवलं आहे.

करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे निराधार, दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असलेले निराधार व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या व्यक्तींच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सुटण्यासाठी शिवभोजनच्या धर्तीवर शरद भोजन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी जिल्हा परिषदेने त्याबाबतचे आदेशही काढले आहेत.

निराधार, दिव्यांग व्यक्तीच्या गावातील अंगणवाडी सेविका या लोकांना रोज दोन वेळेचे जेवण बनवून देईल. त्यामुळे गरजूंच्या जेवणाचा प्रश्न सुटेल, असं पुणे जिल्हा परिषदेने स्पष्ट केलं आहे. शरद भोजन योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या थाळीचा दर प्रत्येकी ५० रुपये ठरविण्यात आला आहे. त्यामुळे या गरजूंना दोनवेळेचे जेवण बनवून देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येक व्यक्तिनिहाय ५० रुपये प्रमाणे दररोज १०० रुपये देण्यात येणार असून त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार असल्याचंही जिल्हा परिषदेने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या शरद भोजन थाळीचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील निराधार, दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असलेले निराधार व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांची ग्रामपंचायत निहाय यादीही तयार करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतचं ट्विट करून या शरद भोजन योजनेची माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button