breaking-newsमुंबई

शरद पवार, अनिल देशमुख मातोश्रीवर दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहचले आहेत. मातोश्रीवर येण्यापूर्वी शरद पवार आणि अनिल देशमुख यांची चर्चा झाली होती, त्यानंतर हे दोघे मातोश्रीवर पोहचले आहेत. शरद पवार, अनिल देशमुख यांच्यासह जितेंद्र आव्हाड, सुभाष देसाईही मातोश्रीवर पोहचले आहेत.

मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसामध्येच रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. याबाबत या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या तात्काळ रद्द करुन राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे मानले जाते. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटातूनही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या सगळ्यामुळे तीन पक्षांच्या सरकारच्या स्थैर्याविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button