breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांनी नातु पार्थला फटकारलं, मात्र अजित पवारांनी मौन राहणंच केलं पसंत

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक शब्दांमध्ये फटकारल्यानंतर राज्यभरात राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे. शरद पवारांनी आपल्याच कुटुंबातील सदस्याला सार्वजनिकरित्या सुनावल्यानंतर पवार कुटुंबात संघर्ष निर्माण होत असल्याचं बोललं जाऊ लागलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच अजित पवार यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे.

निवासस्थानाबाहेर पडल्यानंतर आज सकाळी अजित पवार यांना पत्रकारांनी पार्थवरील टीकेबद्दल प्रश्न विचारलेला आहे. मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता अजित पवार निघून गेले आहेत. त्यामुळे पक्ष आणि कुटुंबातील संघर्षाबद्दल अजित पवार यांनी सध्यातरी भाष्य करण्याचं टाळल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवासस्थानावरून मंत्रालयाकडे गेलेले आहे. दुपारपर्यंत त्यांच्या मंत्रालयात विविध बैठका असून त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होतील, अशी माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button