breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Good News: नोव्हेंबरमध्ये भारतालाही मिळणार कोरोनाची लस

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असतानाच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 130 हून अधिक लशींवर काम सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या लशीच्या स्पर्धेत रशियाने बाजी मारली आहे. मंगळवारी Sputnik V नाव असलेली कोरोनाच्या या लशीचा पहिला डोस राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या मुलीला दिला होता. नोव्हेंबरपर्यंत जगभरातील देशांना कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी माहिती लशीसाठी रिसर्च फंडिंग करणाऱ्या समूहाचे प्रमुख किरिल दमित्रीव यांनी दिलेली आहे.

आतापर्यंत 20 देशांनी रशियानं तयार केलेली लस खरेदी करण्यासाठी तयार झालेले आहेत. भारतालाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकेल असा कयास आहे. या लशीनं मानवी चाचणीचा तिसरा टप्पा अद्याप पूर्ण केला नसल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे ही लस सफल झालेली आहे असं म्हणता येणार नाही असंही तज्ज्ञांनी यावेळी सांगितलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button