breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘शरद पवार पंतप्रधान होणार’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान होण्यास तयार असल्याचं विधान माजिद मेमन यांनी न्यूज18 इंडिया वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केलं आहे.

‘सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात मोट बांधावी आणि शरद पवार यांना पंतप्रधानपदी विराजमान करावे, असं आवाहन मेमन यांनी केलं आहे. 2019मध्ये एनडीएचं सरकार येणार नाही, त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पवारांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवावं. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास, शरद पवार पंतप्रधान होण्यास तयार असल्याचं मोठं विधान मेमन यांनी केलं आहे. देशाला एका अनुभवी नेत्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/News18India/status/1123125067167162368

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button