breaking-newsटेक -तंत्र

व्हॉट्सअॅपमध्ये येणार नवं फीचर, सर्व युझर्सना होणार मोठा फायदा

WhatsApp अॅन्ड्रॉइड युझर्ससाठी एका विशेष टूलवर काम करते आहे. ‘स्पेस’ ही स्मार्टफोनमधली महत्त्वाची बाब आहे. अनेकदा फोटो, व्हिडीओ, किंवा फाईल्समुळे मोबाईल फोनमध्ये जागाच उरत नाही. फॉरवर्डेड मेसेज अनेकदा खूप जागा खातात आणि मग महत्त्वाच्या फाईल्ससाठी जागाच उरत नाही. आता मात्र चिंता करण्याचं कारणच उरणार नाही. नुकतीच माहिती मिळाली आहे की व्हॉट्सअॅप मध्ये स्टोरेज यूसेजसाठी (storage usage tool) एक नवं फीचर येणार आहे. WABetaInfo ने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये म्हटले आहे की व्हॉट्सअॅप गेल्या काही महिन्यांपासून या नव्या फीचरचे टेस्टिंग करत आहे. मात्र हे फीचर प्रत्यक्ष युझर्सला वापरण्यासाठी म्हणून कधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या फीचरमुळे युझर्सना आपल्या फोनमधील स्पेस वाचवण्यास मदत होईल. तसेच व्हॉट्सअॅप मीडिया देखील एक्सप्लोर करणं सोपं जाईल.

रिपोर्टनुसार यातील पहिलं टूल फिल्टर सारखं काम करेल, ज्यामुळे forwaded आणि Large Files तात्काळ शोधता येतील. हे कसं दिसेल याचा एक फोटोदेखील WABeteInfo ने शेअर केला आहे.

स्क्रीनशॉट बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल की स्टोरजपैकी किती जागा वापरली गेली आहे आणि किती जागा शिल्लक आहे. दुसऱ्या सेक्शनमध्ये शेअर्ड फाईल रिव्ह्यू देखील करता येऊ शकतो, नको असलेल्या मीडिया फाईल डिलिट करू शकतो आणि फोनची स्पेस वाचवू शकतो.

यामध्ये Forwaded आणि Large Files पाहायला मिळू शकतात. शेवटच्या सेक्शनमध्ये चॅट लिस्ट उपलब्ध आहे, ज्यामध्ये चॅट सर्चिंग देखील करता येऊ शकते. हे फीचर अजून पूर्ण डेव्हलप्ड झालेले नाही. कदाचित यात आणखी काही महत्त्वाचे टूल अॅड होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button