ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि आयएपीईएन इंडिया यांच्यात सामंजस्य करार

शिक्षण, संशोधन, व्यावहारिक उपयोगात प्रगती करण्यासाठी पीसीयुच्या विद्यार्थ्यांना लाभ

पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगांव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयु) स्कूल ऑफ सायन्सेसने राष्ट्रीय स्तरावर आयएपीईएन इंडिया असोसिएशन फॉर पॅरेंटरल ॲण्ड पॅरेंटरल न्यूट्रिशन बरोबर नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार केला. या करारामुळे आहारशास्त्र आणि क्लिनिकल सायकोलॉजी या क्षेत्रांमध्ये शिक्षण, संशोधन आणि व्यावहारिक उपयोगात प्रगती करण्यासाठी पीसीयुच्या विद्यार्थ्यांना लाभ होईल.

यावेळी आयएपीईएनचे डॉ. मानसी पाटील, डॉ.शिल्पा वर्मा, दत्ता पटेल, डॉ. पी.सी. विजयकुमार, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र-कुलगुरू‌ डॉ. सुदीप थेपडे आदी उपस्थित होते.
पीसीयुच्या स्कूल ऑफ सायन्सेसला पोषण, आहारशास्त्र, क्लिनिकल सायकॉलॉजी आणि संबंधित प्रकल्पांमधील अग्रगण्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या विकास आणि अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरतील. हे विशेष अभ्यासक्रम हेल्थकेअर उद्योगाच्या विकसित होत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अतुलनीय शिक्षण अनुभव आणि करिअरच्या संधी प्रदान करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केले जातील असे स्कूल ऑफ सायन्सेसच्या विभाग प्रमुख प्रा. रुचू कुथियाला यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button