breaking-newsआंतरराष्टीय

व्हाईट हाऊसमध्ये 13 जून रोजी ट्रम्प देणार इफ्तार पार्टी

वॉशिंग्टन (अमेरिका) – व्हाईट हाऊसमध्ये 13 जून रोजी ट्रम्प इफ्तार पार्टी देणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांची मुस्लिमविरोधी अशी प्रतिमा तयार झालेली आहे. मुस्लिम शरणार्थींना त्यांनी दहशतवादी म्हटलेले होते. इराण, इराक आणि सीरिया अशा देशांतून येणारा मुस्लिमांना त्यांनी अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. आणि आपल्या प्रचार सभांमध्ये आपल्याला इस्लामबद्दल तिरस्कार वाटत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवलेले आहे.

सन 2015 मध्ये त्यांनी मशिदी बंद करण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे बोलून दाखवले होते. आणि त्याच वर्षी अनेक मुस्लिम देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातलोई होती.

दर वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याची व्हाईट हाऊसची परंपरा आहे. बराक ओबामा, जॉर्ज बुश, बिल क्‍लिंटन यांनी व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले आहे. मात्र डोनॉल्ड ट्रम्प अध्यक्ष बनल्यानंतर पहिल्या वर्षी व्हाईट हाऊसने इफ्तार पार्टीचे आयोजन केले नव्हते.

या वर्षी व्हाईट हाऊस इफ्तार पार्टीचे आयोजन करणार असले, तरी त्यासाठी कोणाकोणाला निमंत्रण देण्यात आलेले आहे, यासंबंधी काही माहिती देण्यात आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button