breaking-newsआंतरराष्टीय

किम यांनी उत्तर कोरियन लष्कराचे तीन “टॉप’ अधिकारी बदलले

सेऊल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी उत्तर कोरियन लष्कराचे तीन टॉप अधिकारी बदलले आहेत. एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. किम जोंग उन यांच्या या कारवाईने उत्तर कोरियाच्या आर्थिक विकासास आणि बाह्य जगाशी संपर्क साधण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जर किम जोम उन यांना अमेरिका आणि दक्षिण कोरियाशी शांती स्थापित करायची असेल तर प्रथम गोष्ट म्हणजे आपला अण्विक कार्यक्रम बंद करावा लागेल. यासाठी लष्कराचा प्रभाव कमी करण्याचा मार्ग म्हणून लष्कराच्या उच्चपदी किम जोंग उन यांच्याशी एकनिष्ठ असणारे अधिकारी नियुक्त करण्यात आले असावेत असे सीएनएचे आंतरराष्ट्रीय प्रकरण विभागाचे संचालक केन गॉज यांनी म्हटले आहे.

या नवीन अधिकाऱ्यांना विदेशी प्रतिनिधी मंडळांशी चर्चा करण्याचा अनुभव आहे. अमेरिका, रशिया, चीन आणि सीरियाबरोबर वाटाघाटी करण्यास हे अधिकारी अधिक उपयुक्त ठरणार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 12 जून रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्याबरोबर होणाऱ्या शिखर परिषदेची पूर्वतयारी म्हणून हे बदल करण्यात आले असावेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button