breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

व्यावसायिक पदव्या देणा-या काळेवाडी येथील “निलरत्न इनस्टिट्युट”वर गुन्हा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात बेकायदेशीरपणे पाहिजे त्या विषयाची पदवी मिळवून देण्याचा धंदा करत असलेल्या शिक्षण संस्थांचे बिंग अखेर फुटले आहे. काळेवाडीतील अशाच एका संस्थेवर वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथील “निलरत्न इनस्टिट्युट” संस्थेमध्ये ITI/ डिप्लोमा प्रवेश बाहेरू, रेग्युलर, फिटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, DEE, DME (परीक्षा देऊन सर्टिफिकेट दिले जाते) इंजनिरींग, विविध विषयातील डिग्री, डिप्लोमा व MBA च्या पदव्यांसाठी प्रवेश चालू असल्याची जाहिरात काही वृत्तपत्रामध्ये छापून आली होती. या संस्थेची खरी माहिती घेतल्यास लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार केला जात असल्याचे निदर्शनास आले.

संस्थेकडून तंत्र शिक्षणाची डिग्री, डिप्लामाचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी आवश्यक असलेली AICTE व UGC यांची मान्यता संस्थेकडे नाही. बेकायदेशीर पदव्या मिळवून देण्याचा धंदा थाटल्याचे उघड झाल्याने मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष डॉ. आभिषेक हरीदास, संचालक तथा शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार संबंधित संस्थेवर भादसवि कलम ४२० अनुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button