breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

प्रेयसींशी लग्न करण्यासाठी पत्नी-चिमुकल्याला संपवलं, हिंजवडीत धक्कादायक प्रकार

हत्येप्रकरणी चारही आरोपी पोलिसांच्या अटकेत

पिंपरी – प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी आपल्याच पत्नी आणि दहा महिन्याच्या मुलाची हत्या करवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडे भागात घडला आहे. दत्ता भोंडवे असं आरोपीचं नाव आहे.  पोलिसांनी या प्रकरणी दत्तासह त्याची प्रेयसी व दोन मारेकऱ्यांना अटक केली आहे.  ही घटना शनिवारी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास नेरे गावाच्या परिसरात घडलेली आहे. सुरुवातीला दत्ताने आपल्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला करुन पत्नी-मुलाची हत्या केल्याचा बनाव रचला होता, मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दत्ताने गुन्ह्याची कबुली दिली.

दत्ता वसंत भोंडवे (वय 30, रा. दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या नराधम पतीचे नाव आहे. तर अश्विनी भोंडवे (वय 25) आणि अनुज भोंडवे (वय 8 महिने, दोघे रा. दारुंब्रे) असे खून झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे.

३० वर्षीय दत्ता भोंडवेचे लग्नानंतरही एका महिलेशी प्रेमसंबंध होते. पत्नीचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल असं दत्ताने आपल्या प्रेयसीला सांगितलं होतं. यानंतर दोघांनी मिळून ५०-५० हजार रुपयांची सुपारी देत दत्ताची पत्नी आश्विनी व मुलगा अनुजच्या हत्येचा कट रचला. आपल्या पत्नी आणि मुलासह सासुरवाडीवरुन परतत असताना दत्ता भोंडवेने पाणी पिण्याच्या बहाण्याने मुंबई-बंगळुरु महामार्गावर गाडी थांबवली. यावेळी दोन अज्ञात इसमांनी गाडीत शिरुन आश्विनी भोंडवे यांच्या तोंडावर रुमाल ठेवत गाडी जांभे गावाच्या पुढे नेण्याची धमकी दिली.

मात्र ही गाडी नेरे रोडवर आली असतान दोन्ही मारेकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने आश्विनीचा गळा आवळून खून केला. यावेळी गाडीत असलेला दहा महिन्याचा अनुज रडायला लागल्यामुळे, त्याला गप्प करण्यासाठी दोन्ही मारेकऱ्यांनी त्याचीही हत्या केली. दोघांचीही हत्या केल्यानंतर दत्ताने गाडीतील रोखरक्कम चोरीला गेल्याचाही बनाव रचला. मात्र पोलिसी खाक्यापुढे या आरोपींचं काहीही चालू शकलं नाही. या प्रकरणी सध्या चारही आरोपी हिंजवडी पोलिसांच्या अटकेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button