breaking-newsताज्या घडामोडीपुणे
व्यापारी गाळे असून अडचण अन नसून खोळंबा
- जेएम रोडवरील भुयारी मार्ग ३ वर्षापासून बंद
- महापालिकेच्या लाखो रुपयांचे नुकसान
पुणे – शिवाजीनगर येथील जंगली महाराज रस्ता अत्यांत रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरील मॉडर्न कॉलेज चौकात जी. एम. भोसले भुयारी मार्ग मागील तीन वर्षांपासून बंद आहे. जेष्ठ नागरिक, विद्यार्थी,पालक यांना जाण्या-येण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर होत असे.
वाचा :-दर्जेदार महामार्गासाठी व्यापक जनआंदोलन उभारणार
भुयारी मार्गाच्या आतील बाजूस महापालिकेने लाखो रुपये खर्च करून व्यापारी गाळे बांधले आहेत. मात्र, भुयारी मार्ग बंद असल्याने सदरील गाळे देखील बंद आहेत. नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. महेश हांडे यांनी २०१८ साली तत्कालीन महापालिका आयुक्तांना भुयारी मार्ग खुला करावा. या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. नागरिकांची मागणी असून, तसेच पत्रव्यवहार करून देखील हा भुयारी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.