breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रातही दरमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीजपुर‌ठा ?

दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रातही दरमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीजपुर‌ठा करण्याच्या योजनेवर राज्य सरकार विचार करीत आहे. मात्र, या योजनेसाठी दरवर्षी सुमारे ७ हजार १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ‘महावितरण’ आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती पाहता हा भार कोण सोसू शकणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मोफत वीज मिळणार, की हेही फक्त आश्वासनच ठरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीची विधानसभा नि‌वडणूक सध्या देशभरात चर्चेत असून, त्यानिमित्ताने आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीत राबविलेल्या विविध योजनाही आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. त्यामध्ये तेथील मोफत वीज योजनेचाही समावेश आहे. दिल्लीत दरमहा दोनशे युनिट पर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज पुरविण्यात येते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शंभर युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीज पुरविण्याची योजना राज्य सरकारच्या विचाराधिन असल्याची माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. याबाबत ग्राहक संघटनांशी चर्चा झाली असून, येत्या वर्षाअखेरपर्यंत ही योजना लागू करण्याचा मानसही उर्जामंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मात्र, दिल्लीसारख्या छोट्या आणि प्रामुख्याने शहरी लोकवस्ती असलेल्या राज्याची महाराष्ट्रासारख्या राज्याशी तुलना करता, महाराष्ट्रात ही योजना लागू करणे मोठे आव्हान ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button