breaking-newsमहाराष्ट्र

‘वॉव एअर’ ची वॉव ऑफर; दिल्ली-अमेरिका प्रवास फक्त १३ हजार ५०० रुपयांत

नवी दिल्ली : आइसलँडच्या ‘वॉव एअर’ या विमानसेवा कंपनीने सर्वात स्वस्त विमान प्रवासाची घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच आता प्रवाशांना फक्त साडेतेरा हजारांत दिल्ली ते अमेरिका असा प्रवास करता येणार आहे. तर दिल्ली – अमेरिका- दिल्ली अशा राऊंड ट्रिपसाठी साडेतेरा हजार या हिशोबाने २७ हजार रुपये एवढी रक्कम मोजावी लागणार आहे. हे प्रवास भाडं सध्याच्या विमान प्रवासापेक्षा तुलनेने खूपच कमी आहे.

वॉव एअरने या सेवेची घोषणा केली. भारतातील त्यांची सेवा डिसेंबरपासून सुरू होणार असून पहिले उड्डाण ७ डिसेंबरला होणार आहे. दिल्ली विमानतळावरून सुटणारे विमान आईसलँडची राजधानी रेकजॅविकमार्गे न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को किंवा लॉस एंजेलिस येथे उतरेल. ‘जर तुम्ही पाहिले तर भारत ते पूर्व अमेरिकेला जोडणारा सर्वात लहान मार्ग हा आईसलँडवरून जातो. सहाजिकच पल्ला जितका लहान तितकीच इंधनाची बचत होईल त्यामुळे आपसुकच प्रवासाचा खर्चही कमी होईल’ अशी माहिती या विमानसेवेचे संस्थापक स्कली मॉगेनसन यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button