ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीत सैनिक हो तुमच्यासाठी…एक राखी जवानांसाठी!

गायत्री इंग्लिश मीडिअम स्कूलचा लक्षवेधी उपक्रम

विद्यार्थ्यांद्वारे सैनिकांसाठी रक्षाबंधन सोहळा उत्साहात

पिंपरी । प्रतिनिधी

‘राखी’ म्हणजे केवळ रेशमी धागा नाही तर त्या धाग्यापासून त्यांना एक वेगळी शक्ती मिळत असते आणि त्यामुळे त्यांचे आत्मबल वाढते, अशा भावना स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भोंगाळे यांनी व्यक्त केल्या.

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल मोशी, येथील विद्यार्थ्यांनी ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष विनायकराव भोंगाळे, विश्वस्थ सरिता विखे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – ‘मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे’; अजित पवारांचे थेट शरद पवारांना आव्हान?

या उपक्रमासाठी गायत्री विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थिनी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षिका अस्मिता जाधव, योगिता अमराळे व विलास खरे या ठिकाणी उपस्थित होते. दिघी येथील नाईक सुभेदार भोला मिश्रा व हवालदार आर. पी. खोसे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे कडू-पाटील म्हणाल्या की, डोळ्यांत तेल घालून देशाचं रक्षण करणारे बहाद्दर सैनिक सणासुदीला आपल्या कुटुंबियांपासून लांब असतात. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजावी आणि सैनिकांविषयी असणारा आदर त्यांना व्यक्त करता यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रेशीम धाग्याच्या अतिशय आकर्षक व सुबक अशा राख्या, शुभेच्छा पत्रासह वाघा बॉर्डर येथे पाठवण्यात आल्या. त्याचप्रमाणे दिघी येतील गुरुद्वारामध्ये सैनिक बांधवांना गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थी व शिक्षिकांनी स्वतः राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. हा एक भावपूर्ण क्षण होता.

कविता भोंगाळे कडू-पाटील, व्यवस्थापकीय संचालक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button