breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वीजग्राहकांचे संभाजीनगर शाखेला स्थलांतर केल्यास तीव्र पडसाद उमटतील – दिनेश यादव

पिंपरी / महाईन्यूज

चिखली आणि कुदळवाडी येथील वीजग्राहकांना संभाजीनगर शाखेला स्थलांतर करण्याचा विचार महावितरण करत आहे. मात्र, त्याला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे वीजग्राहकांचे संभाजीनगर परिसरात स्थलांतर केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा, फ प्रभाग स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी दिला. याबाबत त्यांनी गणेशखिंड येथील कार्यकारी अभियत्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, महावितरणचे नवीन कार्यालय चिखलीत व्हावे अशी वारंवार मागणी होत आहे. येथील नागरिकाकडून गेल्या ६७ वर्षांपासून हि मागणी होत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र नवीन शाखा देण्याऐवजी नागरिकांना संभाजीनगर येथील शाखेकडे स्थलांतरीत केले जात आहे. त्यामुळे चिखली, कुदळवाडी परिसरातील नागरिकांना आता जवळचे कार्यालय सोडून संभाजीनगर येथील कार्यालयात जावे लागणार आहे. नवीन शाखा, नवीन कर्मचारी हि मागणी असताना स्थलांतर करून नागरिकांना आणखीनच त्रास दिला जात आहे.

काही अधिकाऱ्यांच्या आर्थिक सोयीसाठी हि भुमिका घेतली जात असल्याचा आरोप दिनेश यादव यांनी केला.  चिखली, कुदळवाडीतील परिसर म्हणजे अधिकर्यांना चरण्यासाठी कुरण आम्ही होऊ देणार नसल्याचे दिनेश यादव यांनी सांगितले. नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही. वीज ग्राहकांचे स्थलांतर झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा, या वेळी दिनेश यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button