breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेतील वैश्विक एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या अंतराळयानाला कल्पना चावलाचे नाव

वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे उड्डाण करणाऱ्या एका व्यावसायिक मालवाहक अंतराळ यानाला अमेरिकेने भारतीय वंशाच्या दिवंगत कल्पना चावलाचे नाव दिले आहे. अमेरिकेच्या मानवी अंतराळ यान मोहीमेतील कल्पनाच्या बहुमोल योगदानाबद्दल तिला हा सन्मान दिला आहे. मूळची हरियानाची कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला होती.

अमेरिकेतील वैश्विक एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञान कंपनी असलेल्या नॉर्थग्रुप ग्रमॅनने आमच्या पुढील अंतराळ यान सिग्नेसचे नाव एस. एस. कल्पना चावला, असे असेल असे आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीत म्हटले आहे. अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेत कल्पनाचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे नॉर्थरोप ग्रमॅन एनजी-१४ सिग्नेस अंतराळ यानाला कल्पनाचे नाव दिले आहे. ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे, असेही या कंपनीने म्हटले आहे. २००३ मधील अमेरिकेच्या मानवी अंतराळ मोहिमेत कोलंबिया अंतराळ यानाला अपघात झाला. त्यात कल्पनासह ६ जणांचा मृत्यू झाला होता. कल्पना भारतातील हरियाणाची मूळ रहिवासी होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button