breaking-newsताज्या घडामोडी

विहिरीत आढळला आईसह मुलीचा मृतदेह

श्रीगोंदा | महाईन्यूज

कोरेगव्हाण येथे हंगा नदीजवळील विहिरीत आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आढळून आलेला आहे. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा घातपात असावा असा संशय विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी केलेला आहे. मीना गणेश आढाव (वय ३२, रा. कोरेगव्हाण, ता. श्रीगोंदा), अनुजा गणेश आढाव (वय ६) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. गणेश परशुराम आढाव हे वडील, पत्नी, मुलगीसह कोरेगव्हाण येथे राहत होते.

रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पत्नी व मुलगी घरातून बाहेर पडल्याचे पती गणेश आढाव यांचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी ग्रामस्थ, विवाहितेच्या नातेवाईकांनी कोरेगव्हाण येथे शोध घेतला आहे. गणेश आढाव याच्या घराच्या मागे हंगा नदी तिरा जवळ विहिरीजवळ विवाहितेच्या चप्पला आढळून आल्या होत्या व त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता विवाहितेचा व मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस कर्मचा-यांसह घटनास्थळी हजर झाले आहेत. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button