breaking-newsपिंपरी / चिंचवड

विशालनगरात ‘दिवाळी पहाट’चा उत्साह, ‘चोंधे प्रतिष्ठान’ने गुंफले तेरावे पुष्प

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान आणि यशस्वी महिला संस्था, महिला बचत गटाच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. पिंपळे निलखच्या विशालनगर भागातील रसिकांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

पिंपरी-चिंचवडमधील गायक तुषार रिठे, गायिका आसावरी गोडबोले यांनी भुपाळी अभंग, भक्तिगीते, भावगीते, मराठी व हिंदी चित्रपटातील एकसे बडकर एक गीते सादर केली. पुर्वेच्या देवा तुझे…, उठ उठ पंढरीनाथा…, तुझे नाम आले ओठी…., माय भवानी तुझे लेकरू…, श्री स्वामी समर्थ…., आई दिवाली…., ओम जय जगदीश हरे…, अशी एकाऊन चढ एक गाणी सादर करून गायकांनी रसिकांची मने जिंकली.

कार्यक्रमात तबला रोहन चिंचोरे, ढोलकी-ढोलक-पखवाज संतोष पवार, तबलावाद्य सागर रिठे, कोरस स्वरारंभी स्कूल ऑफ म्युझीकचे विद्यार्थी सिध्दी, विकास, रसिका आणि सौरभ यंनी सथसंगत दिली. यावेळी पुरुषोत्तम दोमकुंडवार, अर्जून पठारे, मुकूंद खाचने, सुभाष इंगळे, भरत इंगवले, सुधाकर वेदपाठक, श्रीधर दाते, सुचित्रा गराडे, कविता चोंधे व परिसरातील 400 नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विशालनगर येथील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आरती चोंधे आणि सामाजिक कार्यकर्ते संकेत चोंधे यांच्या वतीने करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button