breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानचे चार स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय

रविवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून सीआयडी अधिकाऱ्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पाकिस्तानचे चार स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय आहेत अशीही माहिती समोर आली आहे. या चारही स्नायपर्सना हत्यार चालवण्याचं आणि हल्ला करण्याचं उच्च दर्जाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्याच्या साधारण १५ ते १६ तारखेपासून हे स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय झाल्याचं समजतं आहे. १८ सप्टेंबरला CRPF च्या एका जवानावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हा जवान जखमी झाला. या घटनेपासूनच हे स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळते आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन गटांमधले हे चार प्रशिक्षित अतिरेकी आहेत. स्थानिक समर्थकांच्या मदतीने त्यांनी काश्मीर खोऱ्यात तळ ठोकला आहे. त्यांच्याकडे एम-४ कार्बाइन्स रायफल्स असल्याचीही माहिती समोर आली आहे. आता चार स्नायपर्सना शोधून त्यांचा खात्मा करणे हे लष्करापुढचे नवे आव्हान आहे. आयएसआयने या चौघांनाही प्रशिक्षण दिले आहे असेही समजते आहे. एम कार्बाइन रायफलमधून ५०० ते ६०० मीटरपर्यंतचा हल्ला करता येतो कारण या रायफलच्या वर टेलिस्कोप असतो. त्यामुळे डोंगरातून हल्ले करणे सोपे जाते आहे. आता या चार स्नायपर्सना शोधणे हे लष्कर आणि सुरक्षा दलांपुढचे आव्हान आहे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button