breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

विरोधी पक्ष डिझास्टर टूरिझममध्ये व्यस्त; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

कल्याण | सध्या लोकांना फिट ठेवण्यावर सध्या आमचा भर असून विरोधीपक्ष मात्र डिझास्टर टुरिजममध्ये व्यस्त असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी शनिवारी एमएमआर क्षेत्रातील ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मिरा भाईंदर, पनवेल, उल्हासनगर, वसई विरार महापालिका परिसरातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व पालिकेचे आयुक्त उपस्थित होते त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला.

लोकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून फिट कसे ठेवता येईल याचे मुख्य आवाहन आहे. हाताबाहेर गेलेली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजवणारे धारावी मॉडेलचे किरण दिघावकरही या बैठकीला उपस्थित होते. एमएमआर रिजनमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय प्रतिसाद आणि मेडीकल इमर्जन्सी हे दोन महत्वाचे घटक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

तर याठिकाणी आम्ही जम्बो बेड्सची सुविधा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, ऍम्ब्युलन्स आदींची सुविधा वाढवत आहोत. मुंबईप्रमाणे इकडेही अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचाही विचार या बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button