breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा राजीनामा ! अजित पवारांचे आदेश

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे कारभारी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना दिले आहेत. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत साने यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारला जाणार आहे.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येऊन पंधरा दिवस उलटले. परंतु, साने यांना पक्षाकडून तशी रितसर माहिती अथवा आदेश आलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी पदावर राहून काम करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. आता अजित पवार यांनीच शहराध्यक्ष वाघेरे पाटील यांना त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी साने यांना रितसर प्रक्रिया पार पाडण्याची सूचना दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत साने राजीनामा देणार आहेत. अद्याप या पदावर नवीन चेह-याचे नाव समोर आलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button