breaking-newsआंतरराष्टीय

फिनलँड: सना मारिन बनल्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

महाईन्यूज |

आज सना मारिन या फिनलँडच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांचे वय अवघे 34 आहे. साऊली निनिस्तो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिल्यानंतर मारिनोंची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा होत्या. पंतप्रधान पदाची धुरा हाती घेताच त्यांनी विश्व विक्रम रचला आहे. त्या जगातील सर्वात तरुण पंतपधान त्या बनल्या आहेत. असे नाहीय की त्यांना थेट पंतप्रधानपदी बसविण्यात आले आहे. त्या याआधी परिवाहन आणि दळणवळण मंत्री राहिल्या आहेत.

पंतप्रधान पदासाठी निवड झाल्यानंतर मारिन यांनी सांगितले की, मी कधीही वयाचा आणि स्रीत्वाचा विचार केलेला नव्हता. मी केवळ राजकारणात येण्याची कारणे आणि मतदारांनी मला कशाला निवडून दिले आहे याबद्दल विचार करते. मारिन यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1985 मध्ये झालेला आहे. 2015 मध्ये त्या पहिल्यांदा संसदेवर निवडून गेल्या आहेत व त्यानंतर 2019 मध्ये त्या सरकारमध्ये सहभागी झाल्या व मंत्री बनल्या होत्या. सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याचा विक्रम युक्रेनचे पंतप्रधान आलेक्सी होन्चेरुक यांच्या नावे होता तो आत्ता मोडला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button