breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विरोधी पक्षनेता पदासाठी भोसरीला संधी ! अजित गव्हाणे रेसमधील ‘डॉर्क हॉर्स’

  • भाजपच्या शहर नेतृत्वाला जोरदार धक्का
  • वैचारिकदृष्ट्या विचलित करण्याचा राष्ट्रवादीचा डाव

पिंपरी | महाईन्यूज | अमोल शित्रे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे आता या पदावर नव्या दमाचा आणि भाजपच्या भ्रष्ट कारभाराची नस पकडणा-या नगरसेवकाची निवड होणे गरजेचे आहे. पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून फेकण्यासाठी भोसरीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यावर ही जबाबदारी येण्याची शक्यता आहे. कारण, भोसरीतील भाजपच्या शहर नेतृत्वाला धक्का देऊन वैचारिकदृष्ट्या विचलित करण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गव्हाणे यांना विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीतील ‘डार्क हॉर्स’ मानले जात आहे.

विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ नुकताच संपला. या पदावर नवीन नगरसेवकाला संधी मिळणार आहे. त्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वच नगरसेवक इच्छुक असले तरी यावर्षी या पदावर ऐरागैरा नगरसेवक चालणार नाही. कारण, निवडणुका अवघ्या दीड वर्षावर आल्या आहेत. त्यानुषंगाने भाजपच्या गडाला धडका देणारा नगरसेवक हवा आहे. त्यासाठी अभ्यासू आणि चालू पंचवार्षिकीतील भाजपच्या चुकीच्या कामावर बोट ठेवून भाजप नेतृत्वाच्या नाकी नऊ आणणारा विरोधी पक्षनेता हवा आहे. त्यासाठी कार्यकुशल नगरसेवकाची चाचपणी केली जात आहे.

भोसरीचे नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ आणि नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांची नावे चर्चेत आहेत. आकुर्डीचे नगरसेवक जावेद शेख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असते. मात्र, कोरोणामुळे त्यांचे निधन झाल्याने या पदावर अन्य नगरसेवकाची निवड करावी लागत आहे. तरी, भोसरीचे गव्हाणे जोरदार चर्चेत आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यासाठी पक्षाकडून विचारणा झाली होती. मात्र, त्यांनी वरिष्ठांना संधी देण्यात यावी, असे सांगून मागार घेतली. आता पालिका निवडणूक अवघ्या दीड वर्षावर आली आहे. त्यातच भाजपचे शहराध्यक्ष पद आमदार महेश लांडगे यांच्याकडे असल्याने भाजपची सर्व सुत्रे भोसरीतून हलतात. लांडगे यांना वैचारिक दृष्ट्या विचलीत करून राजकीय डाव साधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे गव्हाणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

सत्ताधारी भाजपचा चुकीच्या पध्दतीने कारभार सुरू आहे. चालू वर्षाच्या बजेटवर सभागृहात अन्य नगरसेवकांना बोलू दिले नाही. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून परस्पर विषयांना मंजुरी दिली. सभागृहाचे कामकाज नियमबाह्य पध्दतीने चालविले जाते. तसेच, प्रशासनाला विकास कामांचा ताळमेळ लागलेला नाही. शास्ती कर, अनधिकृत बांधकामे, बंद पाईपलाईन, आंध्रा-भामा पाणी प्रकल्प, स्मार्ट सिटी आदी कामांमध्ये सत्ताधारी आणि प्रशासनाच्या असंख्य चुका आहेत. अनुभवी नगरसेवक म्हणून यावर बोलण्यात आम्ही कमी पडलो असलो, तरी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या प्रश्नांसाठी भाजपला पळताभुई थोडी करणार.

अजित गव्हाणे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button