breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

विराज जगताप खून प्रकरण : ‘त्या’ मुलींची बदनामी झाली त्याची जबाबदारी कोण घेणार : भैय्या पाटील

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

‘सोशल मीडिया’वर (टिकटॉक- फेसबूक) विराज जगताप प्रकरणात चुकीच्या मुलीचे फोटो लावून अश्लिल आणि शिवराळ भाषेत टिका करणाऱ्यांनी संबंधित मुलीची बदनामी केली. याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते भैय्या पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 पिंपळे सौदागर येथील विराज जगताप खून प्रकरणाला ‘सोशल मीडिया’ वर जातीय वळण लागले. काही समाजकंटकांनी थेट या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या मुलीचे फोटो लावून अश्लिल टिप्पण्णी केली. परिणामी, जातीय तणाव निर्माण होवू लागला.

याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते भैय्या पाटील यांनी ‘दुसरी बाजू’ अशा आशयाची पोस्ट लिहली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.

ट्टवीटरवर व्यक्त होताना भैय्या पाटील यांनी म्हटले आहे की, टिकटॉक फेसबूकवर विराज जगताप प्रकरणात चुकीच्या मुलीचे फोटो अश्लिल गाणे लावून आंबेडकरी लोकांनी व्हायरल केले. त्या मुलीचा या घटनेसोबत कोणताही संबंध नव्हता. पण, बापाचा कायदा असल्यासारखे काही लोक स्वत: न्यायाधीश झाले होते.  ‘त्या’ भगिनींची आयुष्यभरासाठी बदनामी झाली. याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.

***

सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार…

विराज जगताप हत्याकांड प्रकरणी दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी सांगवी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तक्रार पिंपरी येथील कार्यकर्ते यशवंत सूर्यवंशी यांनी दाखल केली असून याप्रसंगी निवेदन सादर करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button