breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विध्यार्थी काँगेसचा शहराध्यक्ष ते भाजप शहराध्यक्ष : आमदार महेश लांडगे यांचा संघर्षमय प्रवास!

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पिंपरी- चिंचवड भाजप शहराध्यक्षपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर येणार याबाबत चर्चा सुरू असतानाच आज अखेर आमदार महेश लांडगे यांची शहराध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार लांडगे यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी महापौर माई ढोरे, खासदार अमर साबळे, मावळते शहाराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे सरकार स्थापन केल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते. त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर जगताप यांनी पक्षबांधणीसाठी जोर लावला होता. भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह समर्थकांनी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत जगताप आणि लांडगे यांच्या जोडीने ताकद लावल्याने तीन सदस्यांवरून भाजपाची सदस्य संख्या ७७ वर गेली.राष्ट्रवादी सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. अध्यक्षपदासाठी असणारा कालखंड पूर्ण झाल्याने आमदार जगताप यांनाच संधी देणार की नवीन सदस्यांचा विचार करणार? याबाबत गेल्या तीन महिन्यांपासून चर्चा सुरू होती.

दरम्यान, शहराध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांची निवड झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या विध्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष ते आता भाजप शहराध्यक्ष असा सुमारे 18 वर्षांचा राजकीय प्रवास यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या आमदार लांडगे यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

काँग्रेसच्या विध्यार्थी सेलमध्ये आमदार लांडगे यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रवेश केला. स्थायी समितीचे सभापती म्हणून कारकीर्दही गाजवली. 2014 मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भोसरी विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवली. निवडुन आल्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी 2017 मध्ये त्यांनी आपल्या सर्व समर्थक सहकऱ्यांसोबत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर भाजपने महापालिकेत सत्ता मिळवली. 2019 मध्ये विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढवली आणि जिंकली. अल्पावधीत लांडगे यांनी आपल्या सहकऱ्यांना मानाची पदे मिळवून दिली.

प्रभावी संघटन कौशल्य…

लाल मातीची संस्कृती जपत आणि कुस्तीचे फड गाजवणारा लढवय्या खेळाडू म्हणून आमदार लांडगे यांची ओळख आहे. राजकारणातही खिलाडू वृत्ती जोपासणारा नेता म्हणून लांडगे यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळेच लांडगे यांची तरुणांमध्ये ‘क्रेझ’ आहे. प्रभावी संघटन कौशल्य आणि तरुणांचा फौजफाटा यामुळे आमदार लांडगे भाजपसाठी ‘हुकमी एक्का’ ठरतील, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तवला आहे.

आमदार लांडगे यांचा संघर्ष थोडक्यात…

– राष्ट्रवादीत पदासाठी 12 वर्ष संघर्ष

– 2014 मध्ये आमदार होण्यासाठी संघर्ष

– 2017 मध्ये महापालिका निवडणुकीसाठी संघर्ष

– 2019 मध्ये आता भाजप विरोधी पक्षात आहे. त्यामुळे शहराध्यक्ष म्हणून पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button