ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका कर्मचा-यांचे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार – बबन झिंझुर्डे

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांसाठी मागील दोन वर्षापूर्वी सातवा वेतन आयोग शासन मंजुरीकामी पाठविला असता निवडणुकीच्या तोंडावर तो चुकीच्या पद्धतीने मंजूर करून घेतला. त्यामुळे सर्वच कर्मचा-यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे पदाधिकारी शासनदरबारी प्रयत्न करतील अशी ग्वाही पॅनल प्रमुख बबन झिंझुर्डे यांनी दिली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झिंझुर्डे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले कि, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची स्थापना सर्व कर्मचाऱ्यांचे संघटीत प्रश्न सोडविणे, कामगारांना चांगल्या प्रकारचे जीवनमान देणेकामी प्रशासनाकडून चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन घेणे इत्यादी कामी सन 2022 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ ही कामगार संघटना मान्यताप्राप्त झाली.

कर्मचा-यांना वेळोवळी 5 वा वेतन आयोग 10 वेगळी व जादा वेतन, 5 व्या वेतन आयोगास समकक्ष 6 वा वेतन आयोग, मनपा कर्मचाऱ्यांकरीता ना नफा ना तोटा या तत्वावर महासंघ मेडिकल्सची स्थापना, अधिकारी/कर्मचाऱ्यांकरीता कॅशलेस धन्वंतरी स्वास्थ्य योजना, मनपा कर्मचाऱ्यांकरीता स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाची उभारणी इत्यादी कामे अत्यंत प्रभावीपणे साकारलेली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button