breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता, मुंबईतही मध्यम पाऊस

मुंबई | येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात राज्यात तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस मुंबईतही चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यासह मुंबई आणि उपनगरामध्ये पाऊस गेल्या दोन दिवसांपासून गायब आहे. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसपर्यंत सामान्यपेक्षा जास्त राहील आणि ते ३३ ते ३४ अंशांच्या श्रेणीमध्ये असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आता उत्तर कोकण, गोवा तसेच मुंबई आणि उपनगरांत हवामानात फारसा परिणाम दिसून येणार नाही. मात्र, अधूनमधून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसामुळे मुंबईचे हवामान जवळपास कोरडे राहील. उत्तर भारतात काही ठिकाणी पावसाचा जोर राहिल. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि उपनगरामध्ये २६ किंवा २७ जुलैच्या सुमारास पावसाची शक्यता आहे. परंतु मुंबई व उपनगरामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता नसून पाऊस मध्यम स्वरुपाचा मर्यादित राहील.या काळात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button