breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

विधीमंडळ सचिवालयात जयंत पाटलांची राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून नोंद

मुंबई | जयंत पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत गटनेते असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कारण विधीमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत विधीमंडळ गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आता जयंत पाटलांचा व्हीप लागू होईल, हे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही दिलासादायक बाब आहे, तर अजित पवार आणि भाजपला मात्र यामुळे धक्का बसेल, असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधीमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचं पत्र सोमवारी (25 नोव्हेंबर) दिले. त्यानुसार जयंत पाटीलच गटनेते असतील. त्यामुळे ते किंवा त्यांनी ज्यांची प्रतोद म्हणून निवड केली असेल, त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असतो. विधीमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष किंवा सरचिटणीस करतो. निवडीची माहिती 30 दिवसांत विधानसभा अध्यक्ष किंवा विधानभवन सचिवांकडे द्यावी लागते. शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे, असे राजेंद्र भागवत यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button