breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

विधान परिषदेवर संजय दौंड यांची बिनविरोध निवड

मुंबई | महाईन्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या 24 जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, ही पोटनिवडणूक बिनविरोध झालेली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे संजय दौड यांनी बिनविरोध निवड झालेली आहे.

संजय दौंड माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केल आहे. संजय दौंड 1992 पासून जिल्हा परिषद सदस्य आहेत. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत, मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे आता विधानपरिषदेवर त्यांना संधी देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button