breaking-newsमहाराष्ट्र

विधानपरिषद निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’

लातूर : कर्नाटकमध्ये दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांची आलिशान रिसॉर्टमध्ये बडदास्त ठेवली आहे. तर महाराष्ट्रात भाजपनेही याच कृतीचा कित्ता गिरवला. लातूर-उस्मानाबाद आणि बीड विधानपरिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने पुरेपूर खबरदारी घेतली आहे. लातूर महानगरपालिकेचे भाजपचे निवडून आलेले 36 आणि तीन स्वीकृत नगरसेवक असे 39 नगरसेवक रिसॉर्टला निघाले.

भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवकांचे प्रशिक्षण शिबीर ठेवल्याचे सांगतात. नगरसेवकांना मात्र कुठे जायचं तेच माहित नाही. पक्षाचा आदेश आला, आम्ही गाडीत बसणार, असे ते म्हणतात. भाजपने लातूर महानगरपालिकेतील आपल्या 39 नगरसेवकांना थेट गोव्यात हलवले आहे. या नगरसेवकांसोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांची एका अलिशान हॉटेलात सोय करण्यात आली आहे. या सर्व नगरसेवकांना थेट 21 मे रोजी मतदान केंद्रावर आणले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button