breaking-newsपिंपरी / चिंचवड

विद्या विनय निकेतन विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपळे निलख येथील विशालनगरच्या कै. नारायणराव चोंधे शिक्षण संस्था संचलित विद्या विनय निकेतन इंग्रजी माध्यमिक विद्यालयात आज गुरुवारी (दि. १४) बालदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यकमास संस्थेच्या अध्यक्षा व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका आरती सुरेश चोंधे, सदस्या मुग्धा विनय चोंधे, मुख्याध्यापिका श्रीजा प्रसाद नायर, सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व परीसरातील पालकवर्ग उपस्थित होते.

आरती चोंधे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयात विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. बालचमुंनी फॅन्सी ड्रेस स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडीत जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, शिक्षक, डॉक्टर, भारतमाता, इंदिरागांधी, अश्या विविध वेशभुषा परीधान केल्या होत्या.

तसेच नाटीका नृत्य, पोवाडा, भाषन असे विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले. माया पुजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख निया रणदिने, सहका-यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button