breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक

पुणे –  शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल ( एसएसपीएमएस ) या शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणार्‍या शिक्षक संदीप गाडेला पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थ्याला चित्रकलेची वही अपुर्ण राहिली म्हणून शिक्षकाने अमानुष मारहाण केली होती.

शिक्षकाने केलेल्या मारहाणीविरोधात विद्थार्थ्याच्या पालकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या शरीराचा उजवा भाग लुळा पडला आहे. चेहरा वाकडा झाला. त्यामुळे त्याला नीट बोलणंही अवघड बनलं आहे, अशी माहिती पालकांनी दिली. तक्रारीनंतर पोलिसांना संदीप गाडेला मारहाणीच्या आरोपाखाली सोमवारी सायंकाळी अटक केली आहे.

शिक्षक संदीप गाडे यांनी चित्रे काढली नाहीत म्हणून संबंधित विद्यार्थ्याला बेंचवर हात ठेवण्यास सांगून चेहऱ्यावर आणि पोटात मारहाण केली होती. मारहाणीमुळे विद्यार्थ्याला गंभीर इजा झाली असून अर्धांगवायूचा झटका आला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button