breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विद्यार्थी म्हणतात, ‘गड्या आपला गावच बरा’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ झाले रिकामे, सर्व विद्यार्थी गेले घरी

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात सध्या काेराेनाचे 10 रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यामध्ये ही संख्या 15 वर जाऊन पाेहचली आहे. अशातच आता महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लेक्चर सुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. काेराेनाच्या भितीमुळे पालक आपल्या मुलांना गावाला परत बाेलवत असल्याने विद्यापीठातील 60 टक्के विद्यार्थी आपल्या गावी गेल्याचे चित्र आहे.

दुबईवरुन पुण्यात आलेल्या दांपत्याला काेराेनाची सर्वप्रथम लागण झाल्यानंतर आता हळूहळू राज्यातील अनेक काेराेनाबाधित रुग्ण समाेर येत आहेत. देशात सर्वाधिक काेराेनाबाधित रुग्णांची संख्या राज्यात आहे. राज्यात 31 जणांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यातील विविध ठिकाणांचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यांची संख्या अधिक आहे. हे विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहात किंवा शहरात इतरत्र रुम घेऊन राहतात. सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव पुणे शहरात अधिक असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यापीठाने लेक्चेर्स बंद ठेवल्याने आता विद्यार्थ्यांचे पालक त्यांना घरी येण्याची विनंती करत आहेत.

विद्यापीठाच्या वसतीगृहात राहणारा सतीश पवार म्हणाला, पुण्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. पालक विद्यार्थ्यांना घरी बाेलवत आहेत. सध्या विद्यापीठाने लेक्चर तसेच ग्रंथालय, वाचनालय बंद ठेवल्याने विद्यार्थी आपल्या गावाकडे परतले आहेत. साधारण 60 टक्के विद्यार्थी आपआपल्या घरी गेले आहेत, त्यामुळे सध्या विद्यापीठात शुकशुकाट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button