breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विद्यापीठाचे दूरध्वनी बंद; विद्यार्थ्यांचे हाल

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या बहुतेक विभागांच्या कार्यालयांमधील दूरध्वनी यंत्रणा बंद पडल्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात खेटे घालावे लागत आहेत. दूरस्थ आणि मुक्त शिक्षण केंद्राच्या (आयडॉल) विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

‘आयडॉल’सह कलिना येथील विविध विभागांमधील दूरध्वनी यंत्रणा सहा महिन्यांपासून बंद आहे. कोकण आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना संपर्क साधण्यासाठी विद्यापीठाची अंतर्गत संपर्क यंत्रणा हे हक्काचे ठिकाण होते. मात्र, सध्या ही यंत्रणा बंद असल्यामुळे संपर्क साधण्याचे मार्गच खुंटले आहेत. त्यामुळे अगदी छोटीशी अडचण असली तरीही विद्यार्थ्यांना विद्यापीठात जावे लागत आहे. मे महिन्यापासून दूरध्वनी लागत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांनाही कामात अडथळे येत आहेत. याबाबत विद्यापीठाला निवेदने देऊनही अद्याप काहीच हालचाल झालेली नाही. अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनीही विद्यापीठाला निवेदने दिली आहेत. तांत्रिक कारणामुळे यंत्रणा बंद असून ती लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

सेवाकरार संपुष्टात

विद्यापीठात महानगर टेलिफोन निगम अर्थात ‘एमटीएनएल’चे दूरध्वनी आहेत. त्यांच्याबरोबरचा विद्यापीठाचा करार संपला आहे. त्याला अनेक महिने होऊनही कराराचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे यंत्रणा बंद असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button