breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

विठ्ठलाची विडंबना, देवस्थानचे अधिकारी विठ्ठल जोशींना बडतर्फ करा – संभाजी ब्रिगेड

पिंपरी | महाई्न्यूज | प्रतिनिधी

विठ्ठलाची विटंबना करणा-या पंढरपूर देवस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे.

यासंदर्भात काळे यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे जिल्हा विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आषाढी यात्रेची सांगता विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेने होत असते. ९ जुलैला मंदिरात हि पुजा पार पडली. वास्तविक या पुजेला कार्यकारी अधिकारी उपस्थित असण्याचे किंवा त्यांनी प्रत्यक्ष सहभागी होण्याचे काहिही कारण नाही. परंतु, विठ्ठल आमचे निजधन असे समजून हे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी हे मोठ्या उत्साहात या पुजेत सहभागी झाले. केवळ पुजेस उपस्थित राहुन त्यांचे समाधान झाले नसावे त्यांनी या पुजेच्यावेळी आपल्या उघड्याबंब देहावर प्रत्यक्ष विठ्ठलाला ज्या चांदीच्या तांब्याने स्नान घातले जाते त्याच चांदीच्या तांब्याने स्वता:चे शाही स्नान मंदिराच्या गाभाऱ्यात करवून घेतले.

हा सगळा संतापजनक प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्याने उघड्या डोळ्यांने पाहिला. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वता:चे शाही स्नान घडवून आणणारे आजवरचे एकमेव अधिकारी म्हणावे लागतील. प्रक्षाळपुजेच्या वेळी साथ नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू होता. असे असताना देखील सोशल डिस्टन्स पाळने आवश्यक असताना कोणाच्या तोंडाला मास्क तर नव्हतेच, परंतु सोशल डिस्टन्स हि पाळले नव्हते. स्वत: कोणताही विधीनिषेध न पाळता त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे वारक-यांचा संताप अनावर झाला आहे.

ही पुजा सुरू आहे की पोरखेळ सुरू आहे, असा प्रश्न हि चित्रफित पाहिल्यावर कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. चांदीच्या तांब्याने स्वता:च्या अंगावर पाणी ओतून घेताना विठ्ठल जोशी आमचीच प्रक्षाळपुजा केली असे म्हणत असल्याचे या चित्रफितीत दिसतें. तर यावेळी पुजा करणारे पुजारी असंच असतय देवा असे म्हणताना दिसत आहेत. मोठमोठ्याने हसत टिंगलटवाळी करतांना दिसत आहेत. विठ्ठलाच्या सुरू असलेल्या पुजेत विठ्ठलाचे नामस्मरण व मंत्र म्हणने अपेक्षीत होते. परंतु‌, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी तेथेही हस्तक्षेप करून स्वता:च स्वता:ची पुजा करुन घेत होते. हा संपूर्ण महाराष्ट्रातील वारक-यांचे आराध्य दैवत विठ्ठल व वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावे. अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष काळे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button