breaking-newsमुंबई

विजय मल्ल्या देशातला पहिला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित

भारतातील अनेक बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून ब्रिटनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला अखेर फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. मुंबईतील न्यायालयाने शनिवारी यासंदर्भात निकाल दिला. न्यायालयाने मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्याने त्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोठे आर्थिक घोटाळे, बँकांची फसवणूक यांसारखे मोठे आर्थिक गुन्हे उघडकीस आल्यास गुन्हेगार परदेशामध्ये पलायन करून तिथे आश्रय घेतात. अशा देशांकडून त्यांचे प्रत्यार्पण होणे, त्यानंतर खटले चालविणे यामध्ये खूप वेळ वाया जातो. अशा घोटाळेबाजांवर वचक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ आणला आहे. या कायद्याअंतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर झाल्यास गुन्हेगाराच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनमध्ये पसार झाला आहे. मल्ल्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा बडगा उगारला असून ईडीला मल्ल्याची मालमत्ता जप्त करायची आहे. यासंदर्भात ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर शनिवारी निकाल दिला. न्यायालयाने मल्ल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर केल्याने ईडीला मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मिळाला आहे.

दरम्यान, कर्जबुडवे तसेच आर्थिक गैरव्यवहार करणारे २७ व्यावसायिक गेल्या पाच वर्षांत भारताबाहेर गेले असल्याची माहिती शुक्रवारी संसदेत सरकारच्या वतीने देण्यात आली. लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी सांगितले की, देशाबाहेर गेलेल्या २७ कर्जबुडव्या व्यावसायिकांपैकी २० उद्योजकांविरुद्ध इंटरपोलने नोटिस बजाविली आहे. आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने २७ पैकी ७ उद्योजकांविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याचेही सांगण्यात आले.ब्रिटनद्वारे भारतात हस्तांतरित करावयाच्या किंगफिशर एअरलाईन्सचे विजय मल्या यांच्या प्रक्रियेबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. हिरे व्यापारी निरव मोदीबद्दल मात्र काहीही सांगण्यात आले नाही.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button