breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विजय मल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई – देशाबाहेर पलायन करणारा मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज नव्याने आरोपपत्र दाखल केले. विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांची तब्बल 6 हजार कोटी रूपयांची फसवणूूक केल्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी हे पाऊल उचलण्यात आले.

ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यात मल्ल्याबरोबरच किंगफिशर एअरलाईन्स, युनायटेड ब्रुअरीज होल्डींग लि. या कंपन्या आणि इतरांना आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे. सध्या लंडनमध्ये असणाऱ्या मल्ल्याच्या विरोधात ईडीने मागील वर्षी पहिले आरोपपत्र दाखल केले होते.

सुमारे 900 कोटी रूपयांच्या आयडीबीआय बॅंक-किंगफिशर एअरलाईन्स कर्ज फसवणूक प्रकरणी ते पाऊल उचलण्यात आले होते. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत 9 हजार 890 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मल्ल्या आणि त्याच्या कंपन्यांनी 2005 ते 2010 या कालावधीत घेतलेले कर्ज फेडण्याचे टाळून विविध बॅंकांचे सुमारे 6 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले. त्यावरून भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) दिलेल्या तक्रारीवरून ईडीने नव्याने आरोपपत्र दाखल केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button