breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विजया बँकेचे एटीएम लुटीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक

 

मुंबईतील कांदिवली भागात लोखंडवाला परिसरात विजया बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम लुटण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवस बँकांना सुट्टी होती त्यामुळे एटीएममध्ये रोख रक्कम जास्त असणार असा या चोरट्यांचा अंदाज होता. मात्र हा अंदाज सपशेल फसला. दोन दिवसांपासून हे आरोपी थांबले होते आणि एटीएमवर पाळत ठेवून होते. मात्र लुटीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांपैकी एकाला उत्तर प्रदेशातून पकडण्यात आले. तर दोघांना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पकडण्यात आले.

अँथोनी मनेजेस, शिवम मिश्रा आणि मोहम्मद मोजीम अशी या तिघांची नावं आहेत. या आरोपींकडून दोन रिव्हॉल्वर आणि एक अॅक्टीव्हा गाडीही पोलिसांनी जप्त केली. ही अॅक्टीव्हाही चोरीची असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.मुंबईतील कांदिवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button