breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

विजया, देना बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण, ५ कोटींहून अधिक खाती विलीन

नवी दिल्ली – देशातील तीन बड्या बँकांचं विलीनीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. विजया बँक आणि देना बँकेच्या ३ हजार ८९८ शखा बँक ऑफ बडोदामध्ये विलीन करण्यात आल्या आहेत. खरं तर 1 एप्रिल 2019ला विजया बँक आणि देना बँकेचं विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालंय. बँक ऑफ बडोदानं देना बँकेच्या 1770 शाखांच्या एकत्रीकरणाचं काम डिसेंबर 2020ला पूर्ण केलं. तत्पूर्वी विजया बँकेच्या 2128 शाखांचं एकत्रीकरण सप्टेंबर 2020मध्ये बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये केलंय.

बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा म्हणाले की, “आम्ही कोरोनाच्या संकट काळातही बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केलीय. आम्ही पुन्हा एकदा आमच्या नव्या ग्राहकांचं स्वागत करतो. तसेच त्या ग्राहकांना बँक ऑफ बडोदाच्या सुविधा आणि डिजिटल समाधानाचं लाभ उठवण्याचं आग्रह करतो.

या विलीनीकरणामुळे 5 कोटींहून अधिक ग्राहकांची बँक खाती बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झालीत. त्याशिवाय सर्व शाखांचं एटीएम, पीओएस मशिन आणि क्रेडिट कार्डाच्या एकीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलीय. ज्या 5 कोटी ग्राहकांची खाती बँक ऑफ बडोदामध्ये आलेली आहेत, ती पूर्णतः सुरक्षित आहेत. बँकेच्या विलीनीकरणानंतर या खातेदारांना कार्ड, पासबुक, एटीएमसारख्या वस्तू बदलणार आहेत. बँकेमध्ये जमा असलेल्या पैशांवर या विलीनीकरणाचा कोणताही प्रभाव पडणार नाही.

12 सरकारी बँकांचं विलीनीकरण

सरकारनं 12 सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केलीय. विलीनीकरणानंतर नव्या सरकारी बँकांची रूपरेषा बदलणार आहे.
पंजाब नॅशनल बँक + ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स + युनायटेड बँक
कॅनरा बँक + सिंडिकेट बँक
युनियन बँक ऑफ इंडिया + आंध्र बँक + कॉर्पोरेशन बँक
अलाहाबाद बँक + इंडियन बँक
बँक ऑफ बडोदा + देना बँक + विजया बँक

‘या’ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अस्तित्व पडलं एकटं

स्टेट बँक ऑफ इंडिया
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
युको बँक
पंजाब आणि सिंध बँक
इंडियन ओव्हरसीज बँक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button