breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विकास बहलविरोधात पीडित महिलेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

चित्रपटनिर्माता-दिग्दर्शक विकास बहल याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला होता आणि आपण आपल्या या आरोपावर ठाम आहोत, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र ‘फॅण्टम फिल्म्स्’च्या ‘त्या’ माजी महिला कर्मचाऱ्याने गुरुवारी उच्च न्यायालयात केले. मात्र असे असले तरी आपल्याला हे प्रकरण पुढे न्यायचे नाही, असेही या महिलेने प्रतिज्ञापत्राद्वारे प्रामुख्याने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे बहल याच्यावरील आरोपांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास या महिलेने सुरुवातीला विरोध दर्शवला होता.

याच प्रकरणावरून बहल याने कंपनीत भागीदार असलेल्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच त्यांच्यावर १० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल केला असून त्यांना या प्रकरणाबाबत समाजमाध्यमावर मतप्रदर्शन करण्यापासून मज्जाव करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित महिलेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button