breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या २० भाजी विक्रेत्यांवर गुन्हे
सातारा | सार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या १५ ते २० भाजी विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भाजी विक्रेत्यांसह आणखी १५ ते २० जण असल्याचे पोलिसांनी सांगितले. एसटी स्टॅन्ड ते राधिका सिग्नल जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर हे सर्वजण सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजता भाजी विक्री करत होते.
या सर्वांना पोलिसांनी वाहतुकीस अडथळा होत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधितावर गुन्हे दाखल केले आहेत. साताऱ्यात पहिल्यांदाच भाजी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.