breaking-newsराष्ट्रिय

वाळू शिल्पातून प्लास्टिक प्रदूषणावर प्रकाश

भुवनेश्वर : पुरी येथील समुद्री किनाऱ्यावर ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त कासवाचे शिल्प साकारत वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वाळू शिल्पाद्वारे प्लास्टिक प्रदुषणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पटनायक यांनी ५५ फूट लांब ३० रुंदीच्या आकाराचे कासवाचे वाळू शिल्प साकारले आहे. यासाठी सुमारे ३० टन वाळू आणि प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापर करण्यात आला आहे.

याबाबत सुदर्शन पटनायक यांनी म्हटले की, दरवर्षी जगभरात पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी प्लास्टीक प्रदुषणाविरोधात संदेश देणारे शिल्प साकारले आहे. पर्यावरणासमोर प्लास्टिक प्रदुषणाचे मोठे आव्हान आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कासवं आढळतात. समुद्रातील प्रदुषणाचा विपरित परिणाम त्यांच्यावर होतो. त्यामुळे कासवाच्या शिल्पाद्वारे प्लास्टिक प्रदुषणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button