breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’च्या त्या कर्तबगार डॉक्टरांना सेवाबढती द्या, युवासेनेचा उपरोधीत टोला

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात किडणी निकामी असल्याचे सांगून एका रुग्णावर डायलेसीस करण्यात आले. हे उपचार करणा-या डॉक्टरांना वैद्यकीय सेवेत बडती देऊन शक्य झाल्यास राज्याचा वैद्यकीय विभाग त्यांच्या हाती सोपविण्यात यावा, असा उपरोधीत टोला युवासेनेने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला लगावला आहे.

वायसीएम रुग्णालयात एका रुग्णावर किडणी खराब झाल्याचे सांगून त्याचे डायलेसीस करण्यात आले. मुळात संबंधीत रुग्णाला किडणीचा कसलाही विकार नसल्याचे सांगण्यात येत आहे. तरी देखील त्यावर डायलेसीस करण्याचा प्रकार म्हणजे डॉक्टरांचा निव्वळ निष्काळजीपणा असल्याचा आरोप समाजातून होत आहे. युवा सेनेने देखील त्यांच्यावर सडकून टिका केली आहे.

ज्या डॉक्टरांनी रुग्णावर डायलेसीस केले. त्यांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. त्यांना महापालिकेच्या वैद्यकीय सेवेत बढती देण्यात यावी. शक्य झाल्यास राज्याचा वैद्यकीय विभाग सुध्दा त्यांच्या नियंत्रणाखाली चालविण्यात यावा, असा उपरोधीत टोला युवा सेनेने लगावला आहे. यासंबंधीत निवेदन देताना युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रुपेश कदम, युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, युवा नेते गोपाळ मोरे, शाखाधिकारी ओंकार जगदाळे, राहूल राठोड, रवी नगरकर, सनी कड आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button