breaking-newsपिंपरी / चिंचवड

वादग्रस्त विधान : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी; मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मावळ :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर पडसाद उमटत असताना . त्यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर मावळ चे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शना खाली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हि वडगाव मावळ येथे जाहीर निषेध करण्यात आला. त्याच बरोबर अपशब्द वापरणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मा. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button