breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पक्षनिष्ठेला सलाम’ : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान सुरु असून बहुतांश आमदारांनी आपला हक्क बजावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकांप्रमाणेच विधानपरिषदेच्या वेळीही भाजपचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी विधानभवनात दाखल झालेत. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी सकाळी मतहक्क बजावला, त्यानंतर आजारी असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांनीही मतदान केले. कुठल्याही पक्षाला यांच्यापेक्षा चांगला नेता कोण मिळू शकतो, अशा शब्दात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जगतापांचं कौतुक केलं.

राज्यसभेची तिसरी जागा जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता. अवघ्या दहा दिवसातच असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठीही हे दोन्ही आमदार मतदानासाठी दाखल झाले. गंभीर आजारांशी लढा सुरु असतानाही दोघांनी पक्षनिष्ठा बाळगून मतदानाचा हक्क बजावण्याला पसंती दिली आहे. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

जनतेचे आणि जिद्दी अशा प्रकारचे ते नेते आहेत. त्यांनी एकदा एखादी गोष्ट मनात घेतली, की ते ती पूर्ण करतातच. त्यांना कुठेतरी वाटत होतं की पक्षाला आपली आवश्यकता आहे. आणि ही गोष्ट ध्यानात घेऊनच ते इथे आले, आम्ही नाही म्हटलं असतं, तरी ते आले असते. कुठल्याही पक्षाला यांच्यापेक्षा चांगले नेते कोण मिळू शकतात असं फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button