breaking-newsताज्या घडामोडीपुणे
वाघोलीत एका बड्या राजकीय नेत्याला कोरोनाची लागण
पुणे | पुणे शहरालगत असलेल्या वाघोलीकरांची कोरोना काही पाठ सोडायला तयार नाही. आता वाघोली मधील एका बड्या राजकीय नेत्याला कोरोनाची लागण झाल्याने वाघोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या राजकीय नेत्याच्या संपर्कात जवळपास 100 पेक्षा अधिक लोक आल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाघोलीतील इतर राजकीय नेत्यांचीही मोठी धाकधूक वाढली आहे.
वाघोलीमध्ये आता पर्यंत 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासनाकडून वाघोली परिसरातील नागरिकांना खबरदारीचे आव्हान करण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडने टाळावे अशा सुचनाही प्रशासनाच्या वतीने नागरिकांना देण्यात आल्या आहेत.