breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

#CoronaVirus | सेन्सेक्स कोसळला

मुंबई | भारतात करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने भयभीत झालेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात विक्री केली. यामुळे सोमवारी बाजार उघडताच निर्देशांक २९०० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजारात ८०० अंकांची घसरण झाली.

यामुळे गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले. निर्देशांक १० टक्क्यांनी कोसळला असून लोअर सर्किट बाजारात पाऊण तासासाठी ट्रेडिंग रोखण्यात आले आहे.करोना व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात ३१ मार्च पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र तरीही देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्री करून पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे.

यामुळे बाजारात मोठी पडझड झाली आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा बाजाराला लोअर सर्किट लागले असून ट्रेडिंग थांबवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button